Beed Drought|दुष्काळाच्या झळा आता मुक्या जीवांनाही,माणसांसह मुक्या जीवांचाही जीव पाण्यासाठी टांगणीला

बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या झळा आता केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर मुक्या जीवांनाही सोसाव्या लागत आहेत. गावागावांतील विहिरी, तलाव आणि पाणवठे कोरडे पडल्याने पशुपक्ष्यांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिथे कधीकाळी जनावरांची तहान भागायची, त्या पाणवठ्यांमध्ये आज केवळ डबकाभर पाणी उरलं आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केलेल्या दराडे वस्ती येथील पाझर तलावातून याच भीषण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.

संबंधित व्हिडीओ