शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पक्षाचे उपनेते आणि माजी नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे. या राजीनाम्यामागे त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.