मुंबईत गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या आदेशानंतर पालिकेने कबुतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध आणले आहेत. याशिवाय कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून झाकण्यात आलं आहे. ज्यानंतर एका व्यक्तीने दादारमधील आपल्या कारच्या छतावरुन कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावरुन स्थानिकांनी विरोध केला आहे. कारच्या छतावरुन कबुतरांना दाणे देत असल्याने स्थानिक आणि त्या व्यक्तीमध्ये वादावादी झाल्याचं सांगितलं जात आहे.