हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. तीन एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालार गंज कुटुंबाने हिबानामा म्हणून जावेद शेख यांना दिली. या जमिनीच्या चौकशीसाठी संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. आठ जुलैला आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही अशी माहिती समोर येत आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितल्याची चर्चा आहे