राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात पकडला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.