प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे गायले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली होती.