गडचिरोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुल तालुक्यातील आकापूर गावाजवळ धोकादायक वळण गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे केंद्र बनलंय.. या वळणावर आतापर्यंत ७० ते ८० वाहनांचे अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर मुल पोलिसांनी इथं तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स उभारल्यानंतर अपघातांचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांनी घटलं, असा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय. मात्र, दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी हे बॅरिकेड्स हटवल्याने पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा अपघात घडलाय. भरधाव ट्रक वळणावर नियंत्रण सुटून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळलीय.. तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी