चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं.जीवनदायिनी वैनगंगा नदीच यामुळे एक वेगळे स्वरूप पुढे आलं. गोसेखुर्द घरातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.या नदीचे पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलं. वैनगंगा नदीच्या या पुराचं ड्रोन च्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथील हौशी फोटोग्राफर शिवम मेहर यांनी चित्रण केलं आहे. या चित्रणामुळे वैनगंगा नदीच्या पुरामुळे किती मोठं क्षेत्र बाधित झालं हे स्पष्ट होतं.