Trump यांची डेडलाईन पुतीन मानणार का? साऱ्या जगाचं लक्ष आहे ते 8 ऑगस्टच्या डेडलाईनकडे, पाहूया रिपोर्ट

ट्रम्प यांनी रशियाला दिलेली ८ ऑगस्टची डेडलाईन जवळ आलीय. आणि त्यातच रशियानं युक्रेनवर आजवरचा सर्वाधिक रक्तरंजित हल्ला करून या डेडलाईनलाच आव्हान दिलंय.गेल्या सहा महिन्यात ट्रम्प यांनी कधी पुतीन यांना गोंजारून समजावून पाहिलं, थोड्या लटक्या रागानं दरडावून पाहिलं. संयम संपल्यानंतर धमक्या देऊन इशारेही देऊन पाहिले पण त्याला पुतीन यांच्याकडून वेळोवेळी सोयीस्करपणे बगल देण्यात आलीय. थोडक्यात पुतीन काही ट्रम्प यांना फार गांभीर्यानं घेताना दिसत नाहीएत, त्यातच ब्रिक्स राष्ट्रांनीही ट्रम्प यांच्या इशाऱ्याला फारसं महत्त्व दिलेलं दिसत नाहीए. चीननं तर रशियासह युद्धसरावही सुरु केलाय.त्यामुळे आता साऱ्या जगाचं लक्ष आहे ते ८ ऑगस्टच्या डेडलाईनकडे.... पाहूया एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ