दिल्लीत होणारा पद्म पुरस्कार वितरण सोहळा आणि मुंबई दिल्लीतली पावसाची परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईच्या नियोजित दौऱ्यात बदल झालाय. आज छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात न होता मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी होणार आहे.