गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धवलखेडी गावात अंगणवाडीच्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. डाळ खिचडीच्या पाकिटात हा प्रकार उघडकीस आला. पोषण आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.