Devendra Fadnavis |नक्षलवादी 60 पेक्षा अधिक साथीदारांसह भूपती शरण आला, मुख्यमंत्री काय म्हणाले?

नक्षलवादी चळवळीच्या मुळावर घाव घालणारी घटना आज गडचिरोलीत घडली आहे.. नक्षली चळवळीच्या म्होरक्या.. मोस्ट वाँटेड नक्षलवादी.. तब्बल 6 कोटींचं बक्षिस असलेला टॉप कमांडर भूपती 60 पेक्षा अधिक साथीदारांसह शरण आलाय..... माओवादी चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता असलेल्या भूपतीने शरणागती स्वीकारणं ही घटना राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती ही शस्त्र खाली ठेवून हाती संविधान घेतलंय.. भूपतीच्या शरणागतीने नक्षलवादाचा सर्वात क्रूर चेहरा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलाय... मात्र यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसलाय.. महाराष्ट्रातून नक्षलवाद हद्दपार होण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल मानलं जातंय..

संबंधित व्हिडीओ