Dharashiv| तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका व्यावसायिकाचं फोटोसेशन,भोपे पुजारी मंडळाची लेखी तक्रार

धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव सुरू असतानाच देवीच्या गाभाऱ्यात जाऊन कथित मटका व्यावसायिकाने फोटोसेशन केल्याचा आरोप करण्यात आलाय. सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेशबंदी असताना संबंधित व्यक्तीला व्हीआयपी दर्शन दिल्याने मंदिर संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.विशेष म्हणजे यावेळी मंदिराचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहायक उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.दरम्यान या प्रकरणी भोपे पुजारी मंडळाची जिल्हाधिकारी आणि एसपींकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dharashiv | Alleged 'Matka' operator holds photoshoot inside the sanctum sanctorum of the Tuljabhavani temple; 'Bhope Pujari Mandal' files a written complaint.

संबंधित व्हिडीओ