Nagpur Election | नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत, मतदार कोणाला कौल देणार? | NDTV Marathi
A contest between Congress and BJP in Nagpur; whom will the voters choose?
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधील पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सहा जिल्ह्यांत एकूण 445 मतदान केंद्र असून यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात 246 मतदान केंद्रे आहेत.