मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीतल्या म्हणजेच धारावीतल्या तीन वर्षाच्या समर्थाकडे सामान्य ज्ञानाचा भंडार आहे. राजकारण, भूगोल, विज्ञान तुम्ही फक्त विषय सांगा. तिला सगळं काही माहिती आहे. तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेत पण धारावीच लेबल लागल्यानं तिला चांगल्या शाळेत प्रवेश मिळत नाहीये. म्हणून तिच्या आईला धारावीचा पुनर्विकास हवा आहे.