तिकडे धुळे शहरात गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा गणेश भक्तांना महागाईचा फटका बसला आहे. गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये यंदा तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध आकार आणि आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असून, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. महागाई वाढली असली तरी गणरायाच्या स्वागताचा उत्साह मात्र कायम असल्याचं चित्र धुळ्यात पाहायला मिळत आहे.
Dhule | Ganeshotsav | A look at the crowds of devotees in the Dhule market welcoming Lord Ganesha.