शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या वाढीव टॅरिफ (आयात शुल्क)वरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प भारताची थट्टा करत आहेत आणि सरकार त्यांना उत्तर देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.