वाशिम जिल्ह्यात गेल्या एक ते सव्वा महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. शेतात उभी असलेली सोयाबीन, तूर आणि कपाशीची पिकं आता पाण्याअभावी वाळू लागली आहेत... महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची मेहनत वाया जाताना दिसतेय...पिकांसाठी पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना आभाळाकडे पाहण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही... कर्ज काढून, हजारो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक आता माना टाकू लागलंय... त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे...याच शेतातून आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.
Soybean, tur, and cotton crops in jeopardy due to lack of rain; a conversation held with farmers regarding this situation.