Iran-Israel मुळे जगावर तेलाचं तर आखातात पाणी संकट, कोट्यवधींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

इराण अमेरिका युद्धामुळे एकीकडे जगावर तेलाचं संकट निर्माण झालंय. तर दुसरीकडे पश्चिम आशियात मात्र पाणी संकट ओढवलंय.. आखाती देशांवर आता पाणीबाणीची टांगती तलवार आहे. तेल विहिरींपेक्षा पाणी साठे वाचवण्याचं मोठं आव्हान बनलंय.. इराणने रविवारी बहरिनच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांना लक्ष्य केलं. या प्रकल्पांमध्ये समुद्राचं खारं पाणी हे पिण्यायोग्य गोड केलं जातं. अमेरिका-इस्रायलकडून इराणच्या तर इराणकडून आखातामधल्या इतर देशांच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. तसं झाल्यास कोट्यवधी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल..

संबंधित व्हिडीओ