आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबवण्यात आल्याने त्यावर बिसंबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली असून मुंबई तब्बल 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची आफत ओढवली आहे. हे प्रमाण पुढच्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता असून हॉटेलमध्ये खायचे वांदे होणार आहेत...गॅसशिवाय हॉटेलचे किचन चालूच शकत नाही. त्यामुळे गॅस तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, असे 'आहार' या हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.आहार पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधणार असून संघटनेचे प्रतिनिधी उद्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत.गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे करणार असे संघटनेने नमूद केले.