ऑपरेशन सिंदूर स्थगित असलं, तरी पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं असं भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलंय. ते आयआयटी मद्रासमध्ये एका कार्यक्रमात नुकतंच हे विधान केलं. लोकांनीही या युद्धासाठी कायम तयार राहवं असही जनरल द्विवेदी यांनी म्हटलं.पाकिस्तानात कुणालाही विचारलं की ऑपरेशन सिंदूरच्या लढाईत कुणाचा विजय झाला तर ते लष्कर प्रमुखांना फिल्ड मार्शलची पदवी मिळालीय..म्हणजे विजय आमचाच झाला असेल..' पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे हे सगळ्यांनाच माहितीय, असा टोलाही ट्विवेदी यांनी या कार्यक्रमात हाणलाय.