Ganesh Chaturthi flight rates | कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर गगनाला । NDTV

कोकणात बाप्पासाठी लवकरच पोहोचता यावं म्हणून अनेकजण विमानाने प्रवास करतात. वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा विमानाने सुसाट पोहोचता येईल अशी आशा असते. मात्र सध्या कोकणात जाणं हे थायलँड, सिंगापूर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग झालं आहे. दुबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट 13 हजारांवर आहेत. स्पाईस जेट 16 हजार तर एअर इंडियाचं तिकीट 18 हजारांहून अधिक आहे. 26 ऑगस्ट रोजी, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी स्पाईस जेटचं मुंबई-गोवा विमानाचं तिकीट 21 हजारांपर्यंत (Air ticket prices are highest in Konkan) पोहोचलं आहे. ऐरवी 3 हजारांवर असलेलं विमान तिकीट आता थेट सात पटीने वाढून थेट 21 हजारांवर पोहोचलं आहे. त्यामुळे कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशभक्तांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहे.

संबंधित व्हिडीओ