Exclusive| फुटीर खासदारांसोबतची 'ही' व्यक्ती कोण? ठाकरे गटातून फुटल्यानंतर खासदार कुठे होते?

ठाकरे गटातील 6 खासदार फुटले. यातील संजय जाधव आणि संजय देशमुख हे दोन खासदार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची बातमी ही NDTV मराठीने 16 मे दाखवली होती. या बातमीने मोठा राजकीय भूकंप झाला होता. या बातमीमुळेच ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे जगाला कळाले होते. या सहा खासदारांपैकी काही खासदार हे दिल्ली, तिरुपती, श्रीकालहस्ती, वाराणसी, उज्जैन, भुवनेश्वर, डेहराडून अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. 22 जून रोजी या खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर यात किती खासदार आहेत, त्यांची नावे काय आहेत याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. या खासदारांची ओळख कोणाला पटू नये, त्यांच्याबद्दलची माहिती कोणाला मिळू नये याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांचे सहकारी अॅड. निलेश देशमुख यांना दिली होती. ऑपरेशन टायगरदरम्यानचे काही फोटो , व्हिडीओ आणि देशमुख यांचा चेहरा पहिल्यांदाच समोर आला आहे.

संबंधित व्हिडीओ