गडचिरोलीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय.दादा भुसे यांच्यासोबत आज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर श्रेय घेण्यावरुन तुफान राडा झालाय. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील बहुसंख्या शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली आणि एकमेकांवर भिडले.