गणरायाच्या आगमनासाठी आता पुण्यनगरी सज्ज झालीय. येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहेत. महात्मा फुले मंडई तुळशीबाग येथील गणपती मुर्ती विक्री स्टॉल्स, फुल बाजार विधी पूजेचे साहित्य विक्रीच्या दुकानांवर हजारो लोकांनी गर्दी केली आहे. पुण्यात गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेले आहेत.