उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत... गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या मोदकांच्या खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे... शहरातील मिठाई दालनांमध्ये तब्बल 25 ते 30 प्रकारचे मोदक ग्राहकांसाठी उपलब्ध असून उकडीचे, ड्रायफ्रूट आणि बटरस्कॉच मोदकांना विशेष मागणी आहे... दरम्यान साखर, ड्रायफ्रूट्स, दूध आणि तुपाच्या वाढलेल्या किमतींमुळे मिठाईच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गणेशोत्सवाच्या उत्साहावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही...