Girish Mahajan । Gulabrao Patil । गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात मिश्किल टोलेबाजी । NDTV
Girish Mahajan | Gulabrao Patil | Playful banter between Gulabrao Patil and Girish Mahajan | NDTV
जळगावमध्ये आयोजित पोलीस पाटील मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली... पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्याने गिरीश महाजन हे आपल्या वडिलांसारखे असल्याचं सांगत, ते आपल्या मुलाच्या लग्नालाही आल्याचा उल्लेख केला... यावरून मेळाव्यात हास्यकल्लोळ रंगला... याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा ज्येष्ठ आणि वयोवृद्ध मंत्री असा उल्लेख करत मिश्कील टोला लगावला... तर गुलाबराव पाटील यांनी कितीही तरुण दिसण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनीही गुलाबराव पाटलांना चिमटा काढला... दोन्ही मंत्र्यांच्या या मिश्कील जुगलबंदीमुळे मेळाव्यात चांगलाच रंग भरला.