फ्रान्सच्या पॅरीसमधील आयफेल टॉवरचं कामकाज सोमवारच्या संपानंतर मंगळवारी सुरु झालं.टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी सोमवार सकाळपासून बंद पुकारला होता. शनिवारी सकाळी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था या धार्मिक संस्थेशी संबंधित सुमारे 100 जणांच्या शिष्टमंडळाने आयफेल टॉवरला भेट दिली. त्यावेळी टॉवरच्या व्यवस्थापनानं या भेटीदरम्यान धार्मिक कारणास्तव महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणावरून बाजूला सारण्यास आणि त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला या लिंगभेदा विरोधात आणि भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची खात्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला.तर व्यवस्थापानानं या प्रकारा नंतर दिलगिरी व्यक्त केलीय.
Hindu delegation visits Eiffel Tower; allegations that female staff were sidelined during the visit.