गेल्या 22 महिन्यांपासून इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरु आहे. गाझापट्टीत सतत बॉम्ब वर्षाव करुन इस्रायलनं 75 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवलंय. हमासला मूळापासून संपवण्याचा युद्धाचा उद्देश अद्याप साध्य झालेला नाही त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी संपूर्ण गाझापट्टीवर नियंत्रण मिळवण्याची लढाई सुरु केलीय. शुक्रवारी रात्रीपासून हे ऑपरेशन सुरु झालंय. पण नेतन्याहूंच्या या निर्णयला संपूर्ण जगभरातून तीव्र विरोध होतोय. खुद्द इस्रायलमध्येही नेतन्याहूंच्या निर्णयाविरोधात मोर्चे काढण्यात आलेत. लंडन पासून सिडनीपर्यंत आणि टर्की पासून चिलीपर्यंत सर्वच देशात इस्रायलच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात येत आहेत. त्यामुळे आता युद्ध संपवण्यासाठी इस्रायलवर दबाव वाढतोय. पाहुयात गाझामधल्या वाढत्या संघर्षावरचा हा खास रिपोर्ट