सोन्याच्या बदल्यात जास्त कर्ज मिळणार आहे.सोने खरेदी करणे ही एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. आर्थिक अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून कर्ज घेता येते.सोने कर्ज प्रक्रियेत लोन टू व्हॅल्यू महत्त्वाचे असून त्यावरून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे निश्चित केले जाते.या वर्षापासून रिझर्व्ह बँकने गोल्ड लोनच्या नियमाबाबत काही बदल केले आहेत.नवीन नियमांनुसार, २.५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यासाठी तुमच्या सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्के कर्ज मिळवता येईल.याआधी ही मर्यादा ७५ टक्के एवढी होती. २. ५ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ८५ टक्के एलटीव्ही, तर पाच लाखांपेक्षा अधिकच्या कर्जासाठी ७५ टक्के एलटीव्ही आहे.