मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. "सरकारचे पैसे, आपल्या बापाचं काय जातं?" असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केल्याचे समोर आले असून, या वक्तव्याचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.