Mumbai मध्ये Ajit Pawar यांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ, नातेवाईक मैदानात

राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून पक्षांच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्याही आता हळूहळू जाहीर होऊ लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आलीय.. असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडीओ