सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार आणि नारळावर बंदी घालण्यात आली.भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे.याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे.हा नियम आजपासून लागू होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.