लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी गेल्या दहा दिवसांपासून सातत्यानं फेसाळलेली पाहायला मिळते आहे. इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भात सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा अहवाल सात ते आठ महिन्यात येणार असून भविष्यात इंद्रायणी नदी पूर्ण शुद्ध झालेली दिसेल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय.