सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अक्कलकोटमधील नुकसानीची पाहणी केलीय. गेल्या आठवड्याभरापासून अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस झालाय.नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांना संपर्क तुटला होता. तर पिकांचंही मोठं नुकसान झालंय. याचाच जयकुमार गोरेंनी पाहणी केलीय.तर अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आलंय. खैराट गावात मागील आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे गावात अनेक भागात पाणी शिरलंय.त्यामुळे शेतीसह घरातील अन्न धान्याचे मोठे नुकसान झालंय. तर ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्यातून वाट काढत जाणारा व्यक्ती पाण्यात वाहून गेलाय.