कार्यालयीन वेळेत खर्रा खाऊन काम करणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याला गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी चांगलाच धडा शिकवला... महामार्गाच्या समस्यांबाबत माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात गेलेल्या आमदारांना हा धक्कादायक प्रकार आढळला... त्यांनी तात्काळ संबंधित लिपिकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावत, ती रक्कम शासकीय कोषात जमा करायला लावली. या घटनेची सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.