600 वर्षांनंतर क्रशेनिनिकोव्ह ज्वालामुखी सक्रीय, रिंग ऑफ फायरकडून धोक्याची घंटा? काय घडतंय भूगर्भात?

जे गेले ६०० वर्ष घडलं नव्हतं ते रविवारी घडलं.... रशियाच्या कामच्तका द्वीपावरील कुरील बेटांजवळील क्रशेनिनिकोव्ह ज्वालामुखी सक्रीय झाला आणि त्यातून ६ किमी पर्यंत उंच राख बाहेर फेकली गेली. तर सोमवारीही पुन्हा स्फोट झाला. याला कारण ठरलं ते जुलै महिन्यात कामच्तकामध्ये एकामागोमाग एक झालेले भूकंप. ३० जुलैच्या आजवरच्या सहाव्या शक्तिशाली भूकंपानंतर हा ज्वालामुखी जागा झाला असं तज्ज्ञांचं मत आहे. तर इथलाच आणखी एक ज्वालामुखी क्ल्युचेव्हस्कीदेखील सक्रीय झालाय. जगात याआधी झालेले शक्तीशाली भूकंप हे याच परिसरात झालेले आहेत. शिवाय हवाई बेटांवर तर जगातील अनेक जागृत ज्वालामुखी आहेत.... असं काय आहे या परिसरात की इथं अनेक ज्वालामुखी सक्रीय होतात. आणि भूकंपही होतात... काय घडतंय इथं भूगर्भात... पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ