लातूर जिल्ह्यातील मसलगा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.