शिवसेनेचा पहिला भगवा फडकला तो ठाण्यात.... त्यानंतर ठाणे आणि शिवसेना असं समीकरण झालं.... नंतरच्या काळात ठाणे आणि आनंद दिघे..... आणि त्यानंतरच्या काळात ठाणे आणि एकनाथ शिंदे असं समीकरण झालं.... आता मात्र एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजप आव्हान देणार असं चित्र आहे.... कारण ठाण्यात आमचाच महापौर होणार, असा निर्धार शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांनीही केलाय..... पाहुया ठाण्यावरुन दोन ठाणेदारांमध्ये कशी जुंपलीय...