मुलुंड अपघात प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय.मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जन जखमी झाले आहेत.मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत कार्यकारी अभियंता सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.काल मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. तसंच तीन वाहनं स्लॅबखाली दबली गेली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.