मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे... मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे... आज सकाळी अवघ्या नऊ तासांत 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे... पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठीही अति जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे... पुढील पाच दिवस पावसाचा प्रभाव कायम राहणार असून नागरिकांनी विशेषतः पुढील दोन दिवस सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Mumbai Rain Alert | Orange Alert issued for Mumbai; heavy rainfall to continue for the next 5 days.