मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत... मात्र फडणवीसांचे गावोगावीचे शिलेदार फडणवीसांचा हा आदेश नक्की पाळणार आहेत का.... हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना नंदुरबारमध्ये महायुतीत धुसफूस सुरू झालीय. शिंदे गटाचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर आहेत, असं सांगत विजयकुमार गावितांनी शिंदेंच्या शिवसेनेविरोधातच षड्डू ठोकलाय... गावितांनी दोन आमदारांचं नाव घेत शिंदेंच्या शिवसेनेला खुलेआम चॅलेंज दिलंय...