राज्यात कोकणासह सर्वदूर जोरदार पाऊस होतोय मात्र नाशिकमध्ये जुलै अखेर पर्यंत सरासरीच्या सत्तर टक्केच पाऊस झालाय. पेरण्या झाल्या असल्या तरी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येत्या काही दिवसात पावसानं हजेरी न लावल्यामुळे दुबार पेरणीच संकटही समोर येण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावरील काही धरण सोडली तर अनेक धरण हि पावसाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.