लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) सध्या आपली पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मेहनत घेताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कानपिचक्या दिल्या.