नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंनी रोड शो केला. पण या रोड शो दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंना मशाल चिन्ह दाखवलं तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्य बाणाचा इशारा केला. नाशिक मध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने आलेले आहेत.