मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले. तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं मंगळवारी या पुरस्कारांची घोषणा केली.जॉन क्लार्क, मायकल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनिस यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार मोठ्या प्रमाणात क्वांटम टनेलिंग आणि इलेक्ट्रिकल सर्किटमधील ऊर्जा पातळीच्या शोधासाठी देण्यात आला.विजेत्यांना १०.३ कोटी रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाण पत्र देण्यात येईल. १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममधील कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल या शास्त्रज्ञांनी नेमका काय शोध लावलाय ते पाहूया