Suresh Dhas यांच्या मुलाच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू, अपघातावर सुरेश धस काय म्हणाले? |NDTV मराठी

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव नितीन शेळकेंचा असून सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडलीय. जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस यांच्या गाडीने दुचाकीला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकऱणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ