राज्याच्या आरोग्य विभागानं वादग्रस्त निर्णयांचा सपाटा सुरूच ठेवलेला आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड कंपनी कडनं कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोटयावधी रुपयांची हेल्थ एटीएम मशीन खरेदी केल्याचं समोर आलंय. जीएम पोर्टल वर या यंत्राची किंमत आहे चार लाख चौऱ्याऐंशी हजार हे मशीन आरोग्य विभागानं सहा लाख दहा हजारांना घेतलं.