Pandharpur news l Corridor ला नगरपालिकेतच विरोध, BJP आणि Shinde गटाच्या नगरसेवकांकडून विषय तहकूब

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प स्थानिक पातळीवर नव्या वादात सापडला आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आज कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांसह सर्वच सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवत विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला. बाधित नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीनंतरच प्रकल्प राबवला जावा, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. यावेळी अनेक नगरसेवकांनी कॉरिडॉर प्रकल्पातील त्रुटींवर भाष्य करत भूसंपादनाला विरोध दर्शवला. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी हात वर करून भूसंपादनाचा विषय तहकूब ठेवण्यास मंजुरी दिली. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनीही सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमतानुसार पंढरपूर कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय तहकूब करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. Pandharpur News Opposition to the corridor within the Municipal Council itself; BJP and Shinde faction councilors move to adjourn the agenda item.

संबंधित व्हिडीओ