Parth Pawar| बारामतीत 2 लाख 70 हजारांचा रेकॉर्ड मोडायचा, खासदार पार्थ पवारांकडून विश्वास व्यक्त

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलंय. अशातच आम्हाला 2 लाख 70 हजारांचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असा निर्धार अजित पवार राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्यक्त केलाय. मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊन खूप आहे. उन्हात लोकांना कसे बाहेर काढायचे हा एक मोठा टास्क आहे. आम्ही चांगल्या मतांनी तर शंभर टक्के निवडून येणार आहोत, असेही पार्थ पवार म्हणाले. तर बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. मात्र, काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केले अशी टीकाही पार्थ पवारांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ